इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इंदापुरात १३ ते १७ फेब्रुवारीपर्यंत शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

इंदापुरात प्रशासकीय भवन शेजारी असलेल्या भव्य प्रांगणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १३ फेब्रुवारी रोजी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत या

महोत्सवाला सुरुवात होणार आहे. १४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. १५ रोजी शेतकऱ्यांसाठी ‘एआय तंत्रज्ञानाचा

वापर करून उसाची शेती’ याबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी

महिला व मुलींसाठी खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम तसेच शरदचंद्रजी पवार विचार मंच आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभास खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. १७ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होईल.

 

या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, किसनराव जावळे, छगन तांबिले, अमोल मुळे, अॅड. इनायत काझी, संजय शिंदे, सागर मिसाळ, समद सय्यद, देविदास भोंग, गणेश देवकर, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, दत्ता बाबार,मयुर शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *