.
इंदापूर : माढा तालुक्यातील आलेगाव !! बु !! येथील रहिवाशी असलेल्या पै. बाळासाहेब शेलार यांची लहुजी शक्ती सेना माढा तालुकाध्यक्ष पदी संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
१ मार्च रोजी होत असलेल्या मातंग समाजाच्या महाअधिवेशनासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीचे आयोजन इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे केले होते त्याच वेळी हे नियुक्ती पत्र देण्यात आले. पै. बाळासाहेब शेलार हे लहुजी शक्ती सेना या राज्यव्यापी संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांची माढा तालुकाध्यक्ष पदी गेल्या वर्षीच घोषणा केली होती पण काल ( दि.१७ ) त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी ॲड. अरुण खंडागळे महाराष्ट्र प्रवक्ते, नितीन दोडके महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख, देविदास कसबे महाराष्ट्र संघटक, युवराज अण्णा जाधव कार्याध्यक्ष महाराष्ट्र, दत्ताभाऊ जगताप प्रदेश सचिव, आबासाहेब मोरे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, संजय कदम सोलापूर जिल्हा अध्यक्ष, नवनाथ साठे माळशिरस तालुका अध्यक्ष व सोलापूर व पुणे जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष यांच्यासह अनेक तालुकाध्यक्ष व पदाधिकारी व लहुसैनिक उपस्थित होते.
