इंदापूर तालुक्याचे दमदार आमदार व विद्यमान सरकारमध्ये क्रीडा व युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री असलेले दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने समर्थकांनी तालुक्यासह राज्यात एकच जल्लोष केला.

दत्तात्रय भरणे हे दूरदृष्टी असलेले मंत्री व विकास कामांच्या बाबतीत अग्रेसर असलेले आमदार व मंत्री म्हणुन त्यांचा नावलौकिक आहे. विधीमंडळात पोहोचताच इंदापूर तालुक्यात केलेला चौफेर विकास व पदाधिकारी यांच्या सह समर्थक व मतदार यांच्या प्रति आदरभाव असलेला नेता अशी ओळख महाराष्ट्र भर असल्याने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री करुन त्यांच्यात असलेली विकास कामांची धमक यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे अशी भावना दिसुन येत आहे.

 

मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्यानंतर ती जबाबदारी आता राज्याचे क्रीडा व युवकल्याण व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ होते. परंतु वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळण्यास मंत्री हसन मुश्रीफ यांनी असमर्थतता दर्शविली मुळे ती जबाबदारी आता राज्याचे क्रीडा व युवकल्याण व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन राज्यमंत्री राहिलेल्या दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून काम केले आहे. भरणे यांना नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मंत्री दत्तात्रय भरणे निश्चितच आपल्या कार्याचा ठसा उमटविणार अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *