इंदापूर ( दि.१३ ) : मुख्यमंत्री कृती आराखड्याच्या अनुषंगाने व वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील सुरक्षा व वारंवार घडणाऱ्या घरफोडी व चोरीच्या घटनेला आळा घालण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा रक्षक दलाच्या मेळाव्याला संबोधित करताना गणेश बिराजदार, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती यांनी वरील उदगार काढले. यावेळी सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी, राजकुमार डुणगे, सहायक पोलीस निरीक्षक व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
सविस्तर माहिती अशी की वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या सर्व गावातील वारंवार घडणाऱ्या चोरी व घरफोडी व अन्य गुन्ह्या संदर्भात तपासकामात पोलिसांसह गावातील ग्रामस्थांचा व युवक युवतींचा देखील सहभाग असावा व गावच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीसांसह आपली देखील आहे यासाठी ग्रामसुरक्षा दलात जास्तीत जास्त युवक व युतीने सहभागी व्हावे असे आवाहन करतानाच ग्राम सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना रात्रगस्त दरम्यान गावामध्ये बाहेरून येणारी वाहने तसेच संशयीतांना चेक करून त्यांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन येथे द्यावी असेही आवाहन करण्यात आले.यावेळी ग्रामसुरक्षा दलात कार्यरत असणाऱ्या युवक युवतींना टि शर्ट, लाठी, शिट्टी व बॅटरीचे वाटप करण्यात आले. यावेळी गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक गाव एक पोलीस या योजनेची माहिती देऊन त्यांचं शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ॲड. सुप्रिया बर्गे यांनी महिलांना महिलाविषयक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार व इतर कायद्याविषयी माहिती दिली.
ग्राम सुरक्षा दलाच्या मेळाव्यात वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील विशेष कामगिरी करणारे विविध गावचे पोलीस पाटील मारुती रासकर, विलास कणसे,राजू गायकवाड सागर खरात,उषा वाघमोडे ,पीनाली गायकवाड, रेशमा नेवसे, संदीप चिंचकर,यांचा सत्कार करून उल्लेखनीय कामगिरी बाबत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दक्षता समिती सदस्या सौ. अश्विनी जाधव,सौ. राणी थोरात,सौ.मयुरी जामदार,सौ.सोनाली निंबाळकर,सौ.गीतांजली पाटोळे,सौ.योगिता जाचक यांनी देखील महिलांच्या अडीअडचणी संदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रस्ताविक राजकुमार डुणगे सहायक पोलिस निरीक्षक यांनी केले तर आभार रतीलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक यांनी मानले.
