देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे युपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस, आयपीएस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करावी अशी अनेक जणांची इच्छा. त्यामध्ये यश येतं तर काहीजण अपयशी होतात. कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणे हे तुलनेने अधिक सोपे पण संपूर्ण परिस्थिती अडचणीची असताना किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश (UPSC Result) मिळवणे म्हणजे अधिक कौतुक असतं. हेच यश कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने मिळवलय. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (Birdev Done) असं त्याचं नाव आहे. यूपीएससी मध्ये त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगाव मधील अथणी मध्ये मेंढ्या घेऊन गेला होता.
बिरदेव डोणेचे मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे. शाळेत असल्यापासूनच
आयपीएस होण्याची इच्छा.त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास केला .दोन वेळा अपयश आल्यानंतर ही
खचला नाही तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात 551 व्या क्रमांकाने यश मिळवलं. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे यश मिळवल आहे. बिरदेव डोणेला भारतीय पोलीस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आई -वडील, भाऊ ,बहीण असा बिरदेव डोणेचा चा परिवार आहे.
दहावी -बारावी मध्ये पहिला क्रमांक
बिरदेव चे प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्यामंदिर शाळेत झाले त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले .दहावीमध्ये 96 टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगूड केंद्रात पहिला आला. त्यानंतर मुरगुडच्या शिवराज विद्यालय जुनिअर कॉलेजमध्ये त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावी मध्ये 89 टक्के गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पुण्यातील सीओईपी मधून त्याने इंजीनियरिंग ची पदवी घेतली.
IPS व्हायचं स्वप्न उराशी
सुरुवातीपासून यूपीएससी करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेव ने उराशी बाळगले. पण त्यासाठी अर्थीक परिस्थितीची आडचण होती. दिल्ली पुण्यात जाऊन यूपीएससीचा अभ्यास करणे म्हणजे खर्चाचे. त्यासाठी महिन्यासाठी किमान दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च परवडणारा नाही . त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ आसा
सल्ला बिरदेव च्या वडिलांनी दिला. परंतु आयपीएस व्हायचंय या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली.
बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा भारतीय सैन्यात सेवेत आहे. त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला. बिरदेवने दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला. त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली. पहिल्या दोन संधी मध्ये अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात तो देशात 551 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
निकाल लागला त्यावेळी मेंढ्या घेऊन कर्नाटकात
यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिरदेव हा 551 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले ची बातमी आली. त्यावेळी त्याच्या यमगे गावातील गावकऱ्यांनी जल्लोष केला. पण बिरदेव मात्र गावात नव्हता. बिररदेव त्याच्या आईवडिलांसह बेळगाव मधील अथणी येथे मेंढ्या सह गेला होता.निकालाची माहिती मिळताच पालावर धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला.
जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच कोल्हापुरच्या बिरदेव डोणेने क्रतीतुन सिद्ध केले.
