इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष अनंतराव गायकवाड ,सह सचिव युन्नस शेख, शहर सचिव संजय भोसले, कार्याध्यक्ष राजू क्षीरसागर व अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती तहसील कार्यालय येथे सन्मान करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष आनंतराव गायकवाड म्हणाले आज तहसीलदार साहेब यांचा वाढदिवस आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा दुग्ध शर्करा योग आज आला. खरे तर साहेबांनी इंदापूर तहसीलदार म्हणून कार्यभार हाती घेतल्यापासून आम्ही प्रहार दिव्यांग संघटनेचे हजारो कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामे प्रत्यक्ष भेटून मार्गी लावण्यासाठी मोलाचं सहकार्य आजपर्यंत लाभले आहे भविष्यात देखील साहेबांचे सहकार्य व आमच्या अपंग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना संदर्भात सहकार्य लाभेलच हीच आजच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा.

यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *