इंदापूर ( दि.२१ ) : मागील दोन वर्षापासून इंदापूर परिसरातून शेतकऱ्याच्या विहिरीवरील मोटार व मोटर चालवण्यासाठी लागणाऱ्या सोलर प्लेटा व शेळ्या बोकड अशा विविध गुन्ह्यातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीवर संघटित गुन्हेगारी BNS कलम ११२ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या नवीन कलमान्वये पुणे जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई आहे.
सविस्तर माहिती अशी वडापुरी गावच्या हद्दीत वरकुटे खुर्द रोड वरून जात असताना बद्रीनाथ रामू राठोड (वय ३० वर्ष रा. भगवान बाबानगर रुई ता. बारामती) यांच्या दोन कामगारांना आज्ञाताने अडवून मोबाईल मोटरसायकल, ट्रकची बॅटरी व रोख रक्कम दोन हजार असा ऐवज दमदाटी करून घेऊन गेले अशा आशयाची फिर्याद इंदापूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हा करणारे दोन आरोपींच नावे निष्पन्न झाली
१) खंडू उर्फ राहुल अशोक महाजन (वय १९ ) व एक अल्पवयीन मुलगा दोघेही रा.वडापुरी ता.इंदापुर यांना अटक केली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांचे साथीदार १) सचिन अरुण कांबळे रा. वरकुटे खुर्द ता. इंदापूर , २) साहिल विलास चौधरी राहणार उरुळी कांचन तालुका हवेली ३) रोहित दत्तात्रेय कटाळे राहणार उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे
अटक केलेल्या आरोपींनी आम्ही मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या पाण्यावरील मोटारी व मोटार चालवण्यासाठी वापरण्यात येणारे सोलर प्लेटा, शेळ्या, बोकड इत्यादी चोरी केल्याचे कबूल केले. यापैकी इंदापूरच्या आजूबाजूच्या परिसरातून शेतकऱ्यांच्या पाण्यावरील मोटारीचे एकुण १३ गुन्हे व मोटर चालविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोलर प्लेटाचे एकूण ०३ गुन्हे तसेच शेळ्या बोकड असे एकूण ०५ गुन्हे अटक आरोपीकडून उघडकीस आले. चोरी केलेल्या पैकी काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी संदिप गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, डॉक्टर सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, जीवन मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शोध पथक, पोलीस हवालदार सलमान खान, पोलिस अंमलदार गणेश डेरे,अंकुश माने, तुषार चव्हाण, सुरज गुंजाळ, विनोद लोखंडे, नंदू जाधव, योगेश करचे दिनेश चोरमले यांनी कामगिरी केली.
संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी नवीन कलम BNS कलम ११२ अन्वये जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. सदर गुन्हचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी केला.
सदरच्या कामगिरीने इंदापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
