इंदापूर (दि.१५ ऑगस्ट ) : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त हिंगणगाव जयंती उत्सव कमिटी च्या वतीने प्राथमिक शाळेस “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव व सौजन्य .. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी हिंगणगाव असा नामोल्लेख असलेल्या प्रवेशद्वारावरील कमानीचे लोकार्पण मुख्याध्यापक स्वप्निल धस यांच्या शुभहस्ते व शिक्षकवृंद ,सरपंच रसिका दिगांबर आरडे , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी जयंती उत्सव कमिटीचे पदाधिकारी स्वराज्य न्यूज शी बोलताना म्हणाले की आम्ही सर्वजण याच शाळेत शिकलो या शाळेचे आमच्यावर झालेल्या संस्काराची परतफेड करण्याची बऱ्याच दिवसाची मनात इच्छा होती. गुरुजनवर्ग यांनी आमच्यावर केलेल्या संस्काराच्या शिदोरीमुळे आज आम्ही समाजात वावरतोय. आम्ही या संस्कारमय मातेचे देणे लागतोय म्हणुन प्रवेशद्वारावर शाळेचा उल्लेख असलेली कमान नाही हे लक्षात आल्याने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या कमानीचे आज लोकार्पण मुख्याध्यापक व सर्व गुरुजन वर्ग सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शानदार कार्यक्रमात केले.
यापूर्वी देखील जयंती उत्सव कमिटीच्या वतीने शाळेत विविध वस्तू भेट देण्यात आल्याची माहितीही दिली.
या स्तुत्य उपक्रमाने मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी जयंती उत्सव कमिटीचे आभार मानले.
यावेळी कमानीचे खोदकाम करण्यासाठी जेसीबी चे मोफत सहकार्य केल्याने रोहिदास देवकर,
पेंटिंग चे मोफत सहकार्य केल्याने मोहन आरडे व
वेल्डिंगचे मोफत सहकार्य केल्याने तुकाराम शेळके यांचा जयंती उत्सव कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान करण्यात
आला
