इंदापूर : तालुक्यातील कुरवली येथील रहिवाशी असणार्या महिला गृहिणी ऋतुजा आकाश सावंत व त्यांच्या सासू उज्वला सतिश सावंत यांनी सध्या सुरु असलेले मराठा आरक्षण आंदोलनाला गौरी सजावटीतून पाठींबा दर्शविला असुन गाव खेड्यातील महिलांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सध्या गौरी गणपतीचा सण उत्सव सुरू असतानाच मराठा आरक्षणा आंदोलन हे सुद्धा सुरू असून महाराष्ट्रातील मराठा समाजातील वयोवृद्धापासुन महिला, मुली व तरुणांना हेच आंदोलनं आरपार चे असुन आत्ता नाही तर कधीच नाही हि भावना असुन आपापल्या परीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जो तो धडपडताना दिसत आहे. कुरवली येथील रहिवाशी असणार्या या महिला गृहिणी ऋतुजा सावंत यांनी गाव खेड्यातील महिलांनी या आंदोलनात सहभागी होऊन मुंबई येथे आझाद मैदानात गेलेल्या आपल्या आंदोलक भावांना खाण्यापिण्याचे साहित्य पाठविण्याचे आवाहन तर केलेच आहे पण गौरी सजावट करून गाव खेड्यातील महिलांच्या प्रपंचातील दैनंदिन कामे करतांना आमचें लक्ष या आंदोलनाकडे कसे लागुन राहिले आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या सजावटीमध्ये प्रमुख आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा असलेला फोटो समोरच ठेवून त्यांना दीर्घायुष्य मिळावे व त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळावे ही भावना व्यक्त करताना यातून दाखविले आहे. यासाठी त्यांच्या सासू उज्वला सतीश सावंत यांनी भरभरून असा पाठिंबा दर्शवला असून सुनबाईच्या भावने बरोबरच त्याही इतर महिलांना हा देखावा पाहण्याची विनंती करुन या आंदोलनात आपण ही सहभागी व्हावे असे आवाहन करीत आहेत.

मराठा आरक्षणाच्या पुढील टप्प्यात महिला व वयोवृद्ध देखील देखील सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *