आज कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर जि. पुणे या संस्थेची सन २०२४ – २०२५ या अर्थिक वर्षाची तेरावी वार्षीक सर्वसाधारण सभा आज रविवार दि. १४ सप्टेंबर- २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. समितीचे मुख्य बाजार आवार इंदापूर डाळींब मार्केट यार्ड येथे तुषार देवराज जाधव, सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर यांचे अध्यक्षतेखाली व इंदापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री लि., इंदापूरची ६५ वी वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी इंदापूर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असल्याने समितीत येणारा प्रत्येक शेतकरी व संबंधित घटकांना न्याय तसेच शेतमाल अनुशंगिक सोयी-सुविधा देण्याचे काम बाजार समितीमार्फत केले जाणार आहे. समिती लवकरच इंदापूर येथे केळी मार्केट पुर्ववत करणार आहे. तसेच भुसार, मासे (मासळी), फुले, डाळींब, पेरु, कांदा, ड्रॅगन फ्रुट व सिताफळ या कार्यरत असलेल्या मार्केट वाढीस प्रयत्न करणार आहे. मुख्य बाजार इंदापूर येथे शेतकरी निवास, उपबाजार भिगवण येथे अधुनिक शॉपींग मॉल, मुख्य बाजार इंदापूर शहर व उपबाजार निमगांव-केतकी येथे नविन पेट्रोल पंप व इतर शेतकरी घटकांकरीता शेतमाल खरेदी-विक्री अनुशंगिक सोयी-सुविधा उभारणीचे धोरण आहे. अशी माहिती बाजार बाजार समितीचे मार्गदर्शक PDCC बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.