इंदापूर : ज्येष्ठ नागरिक संघ, इंदापूर या संघाची पुढील तीन वर्षांसाठी (सन 2026 ते 2028) नवीन कार्यकारिणीची निवड शनिवार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता एकमताने करण्यात आली.
संघाच्या अध्यक्षपदी मा. श्री. सुभाष जनार्दन थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. बाळकृष्ण क्षिरसागर व श्री. जवाहर बोरा यांची निवड करण्यात आली.
तसेच अशोक गानबोटे यांची खजिनदार, हनुमंत शिंदे यांची सचिव तर रामदास जगताप यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.
संघाचे मार्गदर्शक म्हणून बाबासाहेब घाडगे, भानुदास पवार, नंदकुमार गुजर व पांडुरंग जगताप यांची निवड करण्यात आली.
संचालक म्हणून अंकुश ढुके, प्रमोद भंडारी, संपत घाडगे, हरीभाई गुजराथी, बबन क्षिरसागर, दत्तात्रेय अनपट, बळीराम शिंदे, केशव बनसुडे, हमीदभाई आत्तार, विलास गायकवाड, महादेव तावरे, विजय भामरे, दिलीप जाधव, जयश्री पोतदार मॅडम व सौ. छाया जाधव मॅडम यांची निवड करण्यात आली.
स्वीकृत सदस्य म्हणून श्रीमती जयश्री गानबोटे व रंगनाथ मधुरकर, प्रसिद्धी प्रमुख म्हणून महादेव चव्हाण, तर सहल प्रमुख म्हणून भारत बोराटे सर यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नव-निर्वाचित सदस्यांचा वृक्ष संजीवनी परिवाराच्या अध्यक्षा सौ. सायराभाभी आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर व भारत बोराटे यांच्या शुभहस्ते फुलांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला.
ही कार्यकारिणी निवड शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

