दि. २१ डिसेंबर

इंदापूर : संवेदनशील ग्रामपंचायत निवडणूक म्हणून घोषित हिंगणगाव ग्रामपंचायतीवर अखेर भैरवनाथ ग्रामविकास पॅनल प्रमुख माजी सरपंच रमेश देवकर गटाने बाजी मारली. नऊ सदस्य व सरपंच असे दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
पैकी रमेश देवकर गटाने सहा सदस्य व सरपंच निवडुन आणुन सत्ता कायम राखली.
अतिशय चुरशीची निवडणूक होईल असे वाटत असतानाच निकालाअंती हि निवडणूक एकतर्फी झाल्यचे स्पष्ट झाले. एकुण तीन वार्ड व प्रत्येकी तीन उमेदवार व जनतेतून सरपंच अशी रचना असणाऱ्या हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या काल (दि.२०) रोजीच्या निकालानंतर देवकर गटाचे वार्ड क्रमांक एक मधील तीनही उमेदवार पराभूत झाले परंतु दुसऱ्या व तिसऱ्या वार्डमधील उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले व त्याचबरोबर सरपंच पदाचे उमेदवार सौ रसिका दिगंबर आरडे या प्रचंड मतांनी विजयी झाल्या त्यामुळे या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा रमेश देवकर गटाची सत्ता कायम राहिली
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
कंसात विजयी मते
सरपंच सौ रसिका दिगंबर आरडे (९८ )
वार्ड क्रमांक दोन :
सौ प्रमिला सिद्धेश्वर खराडे (११४ )
प्रदीप मधुकर देवकर (९३)
जानवी जितेंद्र आरडे (५३)
वार्ड क्रमांक तीन :
सौ संध्याराणी राजेंद्र खराडे (९९)
बाळासाहेब सूर्यभान आरडे (७१)
सौ अंजना नागनाथ चोरमले (४४)
विरोधी जय तुळजाभवानी पॅनलचे विजयी उमेदवार
कंसात विजयी मते
शंकर कृष्णा चोरमले (१४९)
देवकर ऋषी राजेंद्र (११२)
जया सुरेश बनसोडे (८६)
