दि. १२ फेब्रुवारी
इंदापूर : सोमवार (दि १३) रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील महानगर टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा आलिशान महिंद्रा थार कंपनीच्या चार चाकी गाडीने धडक देऊन अमानुष पद्धतीने खून करण्यात आला. या घटनेचा इंदापूर प्रेस क्लबच्या वतीने निषेध करून घटनेतील आरोपी व मुख्य सूत्रधार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली, अशा आशयाचे निवेदन इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना देण्यात आले.
हत्या करणरा आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा धन दांडगा गुंड प्रवृत्तीचा आरोपी हा किती मुजोर प्रवृत्तीचा आहे, त्यांनी आपल्या चारचाकी महिंद्रा थार कंपनीच्या वाहनाने मयत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक देऊन मारले. हा सरळ सरळ खूनच आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे, परंतु या घटनेचा मुख्य सूत्रधार शोधून याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली.
सभ्य आणि सुसंस्कृत भूमिका घेऊन महाराष्ट्रात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद केला केला जातोय का ? आशा गुंडांना कुणाचे अभय आहे ? पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का ? अशा गुंडांना कायद्याचा धाक बसावा यासाठी पत्रकार संरक्षण कायदा आहे, मात्र या कलमान्वये गुन्हे दाखल करायला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे निर्भीडपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना वाढत असल्याने पत्रकार भीतीच्या छायेखाली पत्रकारिता करतोय. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी नक्कीच लाजिरवाणी आहे.
घडलेल्या घटनेचे आरोपपत्र जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी देण्यात यावे व आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा व मुख्य सूत्रधाराला ताबडतोब वरील कलमान्वये अटक करण्यात यावी व महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदनावर बहुसंख्य पत्रकारांच्या सह्या आहेत.
Post Views: 301
