दि. १८ फेब्रुवारी

इंदापूर : खोरोची  तालुका इंदापूर परिसरात दहशत  माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती व गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार इंदापूर पोलीस स्टेशन यांनी एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत पुणे कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. राजू उर्फ राजेंद्र महादेव भाळे (वय २७ वर्ष. रा. खोरोची, ता. इंदापूर) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे                                          पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैद्य शस्त्र बाळगणारे, अमली पदार्थांची विक्री करणारे ,अवैध दारू विक्री करणारे, अवैद्य वाळू व्यवसाय करणारे, तसेच धोकादायक व्यक्ती यांचे विरुद्ध अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी, गुन्हेगारावर कारवाईचा बडगा उगारून एम. पी. डी. ए कायद्यांतर्गत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत, त्यानुसार राजू उर्फ राजेंद्र महादेव भाळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोडा, अपहरण, खुनाचा प्रयत्न,  बेकायदा जमाव जमवून मारामारी करून दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी, जातीयवादी शिवीगाळ करून समाजात तेढ निर्माण करणे  असे गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्यावर एम .पी.डी.ए.कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इंदापूर पोलिसांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी ही कारवाई केली.             सदरची कारवाई अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक दिलीप पवार इंदापूर पोलीस स्टेशन,  सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील इंदापूर पोलीस स्टेशन, अमित सिद पाटील  पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, महेश बनकर पोलीस हवा स्था. गु.शा.पुणे ग्रामीण, पोलीस हवा रामदास बाबर स्था.गु.शा.पुणे ग्रामीण, पोलीस हवा अभिजीत एकशिंगे स्था.गु.शा.पुणे ग्रामीण,पोलीस हवा.स्वप्निल आहिवळे स्था.गु.शा.पुणे ग्रामीण, पोलीस हवा.सचिन बोराडे इंदापूर पोलीस स्टेशन,पोलीस हवा.राकेश फाळके, पोलीस हवा. मोहोळे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद काळे, पोलीस कॉन्स्टेबल विकास राखुंडे, इंदापूर पोलीस स्टेशन यांनी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *