दि. ०३ मार्च

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे माजी आमदार स्व. राजेंद्रकुमार घोलप साहेब यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राजकारण, समाजकारण करीत असताना वर्ष मोठे काम केले. ते स्वतः प्रगतशील शेतकरी होते व त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्नांची जाण होती, अशा शब्दात भाजप नेते व माजी मित्र हर्षवर्धन पाटील यांनी स्व.राजेंद्रकुमार घोलप यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण केली.

               छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, तालुक्याचे आमदार म्हणून राजेंद्रकुमार (तात्या) घोलप यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर काम केले. अनेक संसार उभारण्याचे काम त्यांनी केले. इंदापूर तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांच्या जडणघडणीत तात्यांचा सहभाग होता. स्व.राजेंद्रकुमार घोलप यांनी सतत आम्हांस मार्गदर्शन केले, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *