इंदापूर : आज ता. २ मार्च पासून राज्यांमध्ये दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. गोखळी (ता. इंदापूर) येथील गुरुकुल विद्यामंदिर गोखळी या परीक्षा केंद्रावर इतर शाळेच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यामध्ये हनुमान विद्यालय अवसरी, उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नं. १ , कै. समाजरत्न शिवाजीराव शेंडगे माध्यमिक विद्यालय तरंगवाडी व गुरुकुल विद्यामंदिर गोखळी असे एकूण २२४ विद्यार्थ्यांचा समावेश गुरुकुल विद्यामंदिर, गोखळी या केंद्रावर परीक्षार्थी म्हणून होत आहे. मागील करोना संसर्गाचा काळ एखाद्या भयावह स्वप्रासारखा आला आणि निघून गेला. या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही सर्व विद्यार्थ्यांनी धैर्याने, संयमाने शिकण्याची जिद्द कायम ठेवली त्याबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन! आपण या कसोटीच्या काळात विचलित न होता आत्मविश्वासाने आणि धैर्याने आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत केली त्याबद्दल खरोखरच आपण कौतुकास पात्र आहात व विद्यार्थ्यांच्या उर्जेमध्ये भर पडावी या उद्देशाने शाळेचे संस्थापक/अध्यक्ष मा. बाळासाहेबजी हरणावळ गुरुजी केंद्रसंचालक विश्वास हुलगे सर, रविंद्र मगर सर, प्रविण लोंढे सर, जाविर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना पुढील सर्व पेपरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *