इंदापूर : (दि ३)

इंदापुरात तहसील कचेरीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांच्या अध्यक्षतेखाली गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर म्हणाल्या की केंद्र सरकार सातत्याने दिवसेंदिवस गॅस सिलेंडर किंमतीत वाढ करीत आहे त्यामुळे सर्व सामान्यांचे आर्थीक बजेट कोलमडत आहे ,त्यामुळे सर्व सामान्यांचे व कष्टकरी वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे .सरकार सर्व सामान्य जनतेचा विचार करत नाही ,गेंड्याच्या कातडीच सरकार आहे. हे आंदोलन आम्ही आमच्या नेत्या

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे तसेच इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार दत्तामामा भरणे जिल्हा अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर ,भारतीताई शेवाळे, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी इंदापूर शहर अध्यक्षा उमाताई इंगोले, सुनिता भोसले उपाध्यक्षा ,सुमिता सरतापे ,स्मिता पवार,पुनम पवार , सुवर्णा धायगुडे ,सुवर्णा ,उज्वला चौगुले व महिला पदाधिकारी व अनेक महिला उपस्थित होत्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *