दि. २२ मार्च

इंदापूर : (दि.२२) गुढी पाडवा म्हणजे नव संकल्पनांची सुरुवात असते. प्रत्येकाचे जीवन हे नवचैतन्य, हर्ष, आंनद व धन संपदेने परिपुर्ण राहावे तसेच सर्वांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

आपला महाराष्ट्र विविधतेंनी नटलेला आहे. तसेच आपला देश हा विविध जन समूह, विविध संस्कृती, अनेक धर्म, पंथ, भाषा, बोली यांनी समृद्ध असा बनलेला आहे. सर्वांच्या जीवनामध्ये गोडी वाढवणारा गुढीपाडवा सण असून, प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात सुख, समृद्धी, आपुलकी वाढीस लागावी, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच मराठी नव वर्षात इंदापूर तालुका हा विकास कामांमध्ये निश्चितपणे अग्रभावी राहील, असा आशावादही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
