दि. २२ मार्च

इंदापूर (दि.२२) : बिजवडी तालुका इंदापूर येथील युवक सचिन दिलीप सातव (वय २८ वर्ष) यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला व ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेचे समजताच इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दि. २१ मार्च रोजी रात्री तलवारी सह त्याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला. 

सविस्तर माहिती अशी की दिनांक २१ मार्च रोजी सचिन सातव यांनी तलवारीने केक कापण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई संदर्भात सूचना दिल्या नुसार गुन्हे शोध पथकातील सपोनी योगेश लंगुट, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव यांच्या पथकाने सचिन सातव या युवकाला तलवारीसह त्याच्या घरातून ताब्यात घेतले व त्याच्यावर अवैद्यपणे विनापरवाना तलवार बाळगल्या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नंदू बाळू जाधव यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *