दि. ०२ एप्रिल

वै.प.पु. आनंद योगी महाराज यांच्या आशीर्वादाने सनातन धर्म प्रचारक प. पु. योगी विठ्ठलदास महाराज यांच्या शुभहस्ते कलश पूजन करून मिती चैत्र वैद्य !! २ !! शनिवार ०८ एप्रिल ते चैत्र वैद्य ०७ बुधवार दिनांक १२ एप्रिल पर्यंत मौजे सरपडोह. तालुका करमाळा जि. सोलापूर येथे ग्रंथराज श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन केले असल्याचे मठाधिपती ह.भ.प आरणे महाराज यांनी माहिती दिली.

पुढे बोलताना मठाधिपती आरणे महाराज म्हणाले की, या अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे सलग अकरावे वर्ष आहे. चालू वर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह. भ. प. रामभाऊ बोंद्रे सरपडोह ह.भ.प.कांतीलाल गायकवाड (सौंदे) हे आहेत.

मठाधीपती आरणे महाराज म्हणाले की, संपूर्ण मानव समाजाने एकमेकांना बंधुत्वाच्या दृष्टीने पहावे व वाम मार्गाकडुन सन्मार्गाकडे वाटचाल करावी व अखंड समाधान व आनंद प्राप्त होईल असे वैचारिक धन संत समागमात प्राप्त होत असते. अशा वैचारिक धनाचा ठेवा सर्वांना प्राप्त व्हावा या उद्देशाने हा ज्ञान यज्ञ आरंभलेला आहे. तरी सर्व भाविकांनी काया वाचा मनाने सहकार्य करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचनकार म्हणून ह.भ.प सहदेव धांडे महाराज (कोळवडी तालुका कर्जत ) ह.भ.प.किसन खरात महाराज (सरपडोह) ह.भ.प.भारत नाळे महाराज (वीट), ह.भ.प.प्रा.डॉ.सुधीर बापू इंगळे (फलटण) हे आहेत

कीर्तनकार ह.भ.प.बापू कांबळे महाराज (मोरवड) , ह.भ.प.मोहन मंगलनेर महाराज (पंढरपूर), ह.भ.प उरमुडे महाराज (ढवळस पिंपरी तालुका माढा), ह.भ.प.अक्षय शेळके महाराज (उपळवाटे), हे आहेत.

अखंड हरिनाम सप्ताह च्या अखेरच्या दिवशी ह.भ.प.कांतीलाल गायकवाड महाराज (सौंदे) यांचे काल्याचे किर्तन होणार असून राजू माणिक लोंढे (गुरुजी) व डॉक्टर प्रमोद कुमार महादेव जगताप (अकोले) यांच्या वतीने भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे मठाधिपती आरणे महाराज यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *