दि. ०८ एप्रिल

पुणे जिल्हा परिषदे चे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती तथा सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण भैय्या माने यांचे खंदे समर्थक गौरव भैया पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न होणार असल्याचे आयोजक प्रवीणभैय्या माने मित्रपरिवार इंदापूर तालुका यांनी जाहीर केले आहे.
येत्या १० एप्रिल रोजी गौरवभैय्या पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती तथा सोनई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण भैय्या माने यांच्या शुभहस्ते इंदापूर येथील अनाथ आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप, वृक्षारोपण, उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे रुग्णांना फळे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी जाहीर केले.
अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी प्रवीण भैय्या माने मित्रपरिवार व गौरवभैय्या पवार मित्रपरिवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
