दि. १४ एप्रिल

इंदापूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त शहरातील आंबेडकर नगर , सरस्वती नगर, बौध्द विहार,नगरपालिका या व इतर ठिकाणी तेजपृथ्वी ग्रुपकडून बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले.
या वेळी तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात म्हणाल्या बाबासाहेब नेहमी सांगायचे तुम्ही किती अंतर चालत गेला यापेक्षा कोणत्या दिशेने गेला तुमच्या चालण्याने गोरगरीब, कष्टकरी शेतकरी विद्यार्थी यांना किती फायदा झाला हे महत्वाचे आहे, बाबासाहेबांनी नेहमीच समता,स्वतंत्रता बंधुता शिकविणारा धर्म निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, आज आपण जे समाजात मानाने फिरतो हे माझ्या बाबासाहेबांची देण आहे.शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांची ज्यांनी समाजाला जाणीव करून दिली, झोपलेल्या समाजाला झोपेतून जागे केले,गोरगरीबांना त्यांचे हकक मिळवून दिले,ज्यांच्या नावाने देश चालतो आपणास एखाद्या विषयावर चार ओळी लिहायला जमत नाही माझ्या बाबांनी संविधान लिहिलं आणि याच संविधानाच्या जोरावर आज आपण मानाने फिरतो या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीी निमित्त कोटी कोटी प्रणाम.

त्यापुढे बोलताना म्हणाल्या की आपणाला जे अधिकार मिळाले ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाले. आपण या अधिकाराचा उपयोग कायमस्वरूपी चांगल्या कामासाठी करून समाजाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि हेच बाबासाहेबांना विनम्र अभिवादन ठरेल. या वेळी त्यांनी भीमसैनिक व आंबेडकर अनुयायी यांना जयंतीनिमित्त शुभेच्छाा दिल्या. यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे,सद्दाम भाई बागवान व इतर मान्यवर उपस्थित होते,
