दि. १४ एप्रिल

शैक्षणिक संकुलात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३२ वी जयंती साजरी.

*इंदापूर*:- (दि.१४) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्तीस ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमांना इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) , संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरेंच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी सामूहिक पंचशील, त्रिशरण घेण्यात आले.

यावेळी मनिषा जगताप मॅडम , सविता गोफणे मॅडम, प्रा. रेश्मा झेंडे, प्रा.जावेद शेख, प्रा.सोमनाथ माने, अधिक्षक लता सातपुते, निता भिंगारदिवे, प्राचार्या अनिता साळवे, मुख्याध्यापक साहेबराव पवार आदींची भाषणे झाली, तर हिरालाल चंदनशिवे सर यांनी भीमगीत सादर केले.

यावेळी संचालक अस्मिता मखरे,सचिव ॲड. समीर मखरे, अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) यांनी डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षक-प्राध्यापक, अधिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीेतेसाठी अधिक्षक अनिल ओहोळ व चतुर्थ कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *