दि. ११ मे

इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देवा बेसबॉल अँड स्पोर्ट्सअकॅडमी व कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यातून नामवंत बेसबॉलचे निमंत्रित संघ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड व एलपीयू पंजाब असे एकूण बारा निमंत्रित संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम, बाळासाहेब मोरे, पृथ्वीराज पाटील, प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, मुख्याध्यापक विकास फलफले व देवा बेसबॉल अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव डॉ.भरत भुजबळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अंतिम सामना पंजाब व देवा स्पोर्ट्स यांच्यामध्ये झाला त्यामध्ये विजयी देवा बेसबॉल अँड स्पोर्ट्स अकॅडमी, इंदापूर व उपविजयी पंजाब संघा झाला, तर तृतीय क्रमांक मध्य प्रदेश (इंदौर) संघाने आणि चतुर्थ क्रमांक अहमदनगर या संघांनी पटकावला असून विजेत्या संघास 25000 रुपये व चषक उपविजेत्या संघास 20000 रुपये व चषक तृतीय क्रमांकास 15000 रुपये व चषक आणि चतुर्थ क्रमांकास 7500रुपये व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आली होती तसेच सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट व कॅप्स देवा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आणि क्रीडाप्रेमी यांच्या सौजन्याने देण्यात आले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी स्वप्निल गलांडे,नागेश तरटे, योगेश मोरे, साहिल बागवान , अक्षय क्षिरसागर संदीप जगताप व महाविद्यालयाचे सर्व आजी-माजी बेसबॉल खेळाडू व स्वयंसेवक यांनी कष्ट घेतले.
