दि. २० मे

 

इंदापूर : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेचा निकाल लागला असून पोलीस दलात भरती झालेल्या युवक व युवतींचा सन्मान सोहळा सामाजिक कार्यकर्ते अण्णा ढावरे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अनिता ढावरे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल (आप्पा) ननवरे यांनी मनोगत व्यक्त करताना वरील उद्गगार काढले. 

यावेळी बोलताना विठ्ठल आप्पा ननवरे म्हणाले की आई वडिलांच्या कष्टाची व तळमळीची जाणीव ठेवून महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये भरती झालेल्या तुम्हा सर्वांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.आपण अतिशय संघर्षातून पोलीस सेवेमध्ये भरती झाला परंतु प्रामाणिकपणे देशसेवा करीत असताना जन्म देणाऱ्या मातेला व संस्कार देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की बाबुळगाव सारख्या एका छोट्याशा खेडेगावात एकाच वेळी चार मुले पोलीस दलामध्ये भरती होणे ही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी संस्कार व इच्छा शक्ती प्रबळ असावी लागते व त्याला पूरक असे वातावरण असावे लागते.भरती झालेल्या सर्व मुलांच्या आई वडिलांचे देखील व ग्रामस्थांचे देखील मी अभिनंदन करतो.

आजच्या सन्मान सोहळ्याचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते अण्णा ढावरे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सौ अनिताताई ढावरे पती-पत्नी हे नेहमी समाजातील तरुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी धडपडत असतात व वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. आज पर्यंत समाजातील तरुण वेगवेगळे क्षेत्रात आपले कौशल्य दाखवतात व त्यांचा सन्मान हे दोघेही पती-पत्नी स्वखर्चाने करीत असतात .कोरोना काळामध्ये ढावरे पती-पत्नी यांनी समाजाची सेवा अतिशय प्रामाणिकपणे केली त्यांचा मुलगा गेल्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदी दाखल झाला आहे. आपल्या समाजातील असेच मुले मुली मोठमोठ्या पदावर जावीत हीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. 

               . 

यावेळी विठ्ठल (आप्पा) ननावरे म्हणाले की बाभुळगाव मधील गेल्या वर्षी मनोज खिलारे नावाचा मुलगा उपनिरीक्षक पदी विराजमान झाला व यावर्षी तीन मुले पोलीस सेवेत दिमाखात दाखल झाली व आप्पासाहेब मिसाळ यांचा मुलगा नागेश मिसाळ कृषी अधिकारी झाला याचा सार्थ अभिमान आम्हालाही शहरवासीयांना देखील आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. बाभुळगाव मधील अशोक चव्हाण यांची दोन्ही मुले,सून पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. सून संपदा जाधव बुलढाणा येथे आरटीओ आहे तर राजू अशोक चव्हाण पोलीस उपनिरीक्षक व दुसरा मुलगा पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहे.

 

हिंगणगाव येथील ऐश्वर्या शशिकांत गवळी ही मुलगी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस मुंबई शहर येथे सेवेमध्ये भरती झाली त्याबद्दल तिच्यासह आई वडिलांचे कौतुक केले.

 

       यावेळी महादेव मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजकाचे व उपस्थित असणारे सर्वांचे आभार व्यक्त केले व निवड झालेल्य

सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये भरती झालेले मुले

१) पप्पू भगवान आरडे (२०१९ महाराष्ट्र पोलीस)

२) प्रथमेश तानाजी मोरे ( महाराष्ट्र पोलीस) 

३) स्वप्निल महादेव मिसाळ ( महाराष्ट्र पोलीस) 

४) ऐश्वर्या शशिकांत गवळी (महाराष्ट्र पोलीस) 

५) नागेश रामचंद्र ( आप्पासाहेब) मिसाळ

       ( कृषी अधिकारी) 

प्रस्ताविक आप्पासाहेब मिसाळ यांनी केले यावेळी विठ्ठला (आप्पा ) ननवरे यांच्यासह तानाजी धोत्रे, प्रदेश सरचिटणीस भटक्या विमुक्त जाती जमाती, बाळासाहेब ढवळे (शहराध्यक्ष राष्ट्रवादी) , गोपीचंद गलांडे (माजी सरपंच),आप्पासाहेब मिसाळ अशोक पोळ (जिल्हाध्यक्ष समता सैनिक दल), नगरसेवक गजानन गवळी, अशोक चव्हाण (निवृत्त असिस्टंट आयटीआय),शशिकांत गवळी (पालक),धनंजय आरडे  नाथा ढावरे उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *