दि. ३० मे

इंदापूर : मंडल कृषी अधिकारी भिगवण या ठिकाणी कार्यरत असणारे मंडलाधिकारी बाळासाहेब कोकणे यांची पदोन्नती जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी पुणे या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी पेढे भरवुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर म्हणाले की बाळासाहेब कोकणे हे नेहमी कार्यतत्पर म्हणून आमच्या खात्यामध्ये ओळखले जात. वक्तशीरपणा व शेतकऱ्यांसंबंधी असणारी सर्व कामे वेळेवर कशी पूर्ण होतील यासाठी नेहमी त्यांचा प्रयत्न असायचा. निश्चितच त्यांना पदोन्नती मिळाली याचा आनंद तर आहे पण त्या ठिकाणी देखील आपल्या कामाचा ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे.
पुढे बोलताना तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर म्हणाले की सणसर या ठिकाणी मंडल कृषी अधिकारी कार्यालयात असणारे आमचे सहकारी मंडलाधिकारी विक्रम वाघमोडे यांचीही धाराशिव जिल्हा परिषद येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या ठिकाणी पदोन्नती झाली आहे त्यांना देखील आमच्या कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो व विक्रम वाघमोडे हे देखील आपल्या कार्याचा ठसा निश्चितच उंचावल्याशिवाय राहणार नाहीत या दोघांनाही कृषी कार्यालय इंदापूरच्या वतीने व सर्व सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो असेही शेवटी म्हणाले.
