दि. ४ जून

बारामती, दि. ४ जून –येथील महावितरण कंपनीच्या बारामती मंडल कार्यालयात उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदावर कार्यरत असलेले श्री. उल्हास खिल्लेश्वर पाटील यांचे शुक्रवारी (दि. २) दुपारी अपघाती निधन झाले.
श्री. उल्हास खिल्लेश्वर पाटील (वय ५६ वर्षे) १९९४ साली तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपीक पदावर रुजू झाले होते. मूळ भुसावळ (जि. जळगाव) येथील असलेले श्री. उल्हास पाटील नोकरीनिमित्ताने गेल्या २५ वर्षांपासून बारामती येथे स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी विद्या, मुलगा कुणाल व मुलगी किरण असा परिवार आहे. शनिवारी रात्री उशिरा अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मनमिळावू असलेल्या उल्हास पाटील यांच्या अकस्मात निधनाने पाटील परिवारासह महावितरणमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
