दि. ०९ सप्टेंबर

इंदापूर : (दि.९) इंदापूर शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या एसटी बस चा खुळे चौक व विद्या प्रतिष्ठान येथे अधिकृत बस थांबा करावा अशा आशयाचे लेखी निवेदनाद्वारे मागणी सौ रोहिणी दादा राऊत ,संस्थापक अध्यक्षा समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्था यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली. 

निवेदनात म्हटले आहे की इंदापूर हून बारामती, अकलूजला जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व एसटी बसची वाहतूक खुळे चौक मार्गे केल्यास बाबरस मळा, विद्या प्रतिष्ठान येथील शालेय विद्यार्थ्यांचे गैरसोय होणार नाही त्यामुळे खुळे चौक व विद्या प्रतिष्ठान येथे अधिकृत बस थांबा व्हावा अशी विनंती लेखी निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापक यांच्याकडे सौ रोहिणी राऊत यांनी केली. 

निवेदनावर बाबरस मळा व विद्या प्रतिष्ठान परिसरातील असंख्य नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. 

आगार व्यवस्थापक यांच्या वतीने वाहतूक निरीक्षक परशुराम भोसले यांनी निवेदन स्वीकारले. 

     यावेळी दादा राऊत ,तानाजी शिंगाडे, किरण गोफणे उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *