दि. ०९ सप्टेंबर

इंदापूर ते अकलुज एस टी बस फेऱ्या खुळे चौक ते विद्या प्रतिष्ठान ते परी चौक ते अकलूज नाका मार्गे इंदापूर शहरात असाव्यात ही केली मागण
इंदापूर : (दि.९) अकलूज वरून इंदापूर शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बस सेवा ही शहरातून खुळे चौक ते विद्या प्रतिष्ठान ते अकलूज नाका या मार्गाने असावी अशी लेखी मागणी रेश्मा शेख प्रदेश सचिव मानव विकास परिषद यांनी निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापक इंदापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक इंदापूर यांना केली.

यावेळी बोलताना रेश्मा शेख म्हणाल्या खुळे चौकापासून विद्या प्रतिष्ठान या कॉलेजमध्ये शिकत असणारे विद्यार्थी हे पायी चालत येत असतात.हा प्रवास जवळचा वाटत असला तरी रोजची पायपीट ही विद्यार्थ्यांची दमछाक करणारी आहे .बस सेवा ही शाळेच्या वेळेत असावी ही आमची प्रमुख मागणी आहे.या मार्गे बस सेवा सुरू झाली तर बाबरसमळा व परिसर तसेच तापी सोसायटी व परिसरातील महिला, कॉलेज, शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची देखील शहरात येण्या-जाण्याची सोय उत्तम प्रकारे होणार आहे. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे बस सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
आगर व्यवस्थापकाच्या वतीने निवेदन वाहतूक निरीक्षक परशुराम भोसले व सहाय्यक वाहतूक निरीक्षक संतोष चौगुले यांनी स्वीकारले. यावेळी निर्मला जाधव पुणे जिल्हाध्यक्ष, माधवीताई सोननीस इंदापूर तालुका अध्यक्ष व एडवोकेट रेश्मा गार्डे पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार उपस्थित होत्या.
यावेळी वाहतूक निरीक्षक परशुराम भोसले म्हणाले की निवेदनातील नमुन मार्गाने शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता बससेवा चालू कराव्यात असा वरिष्ठांचा आदेश दोनच दिवसांपूर्वी आम्हास प्राप्त झाला आहे नमूद वेळेत बस न आल्यास किंवा न थांबल्यास ताबडतोब आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रवाशांना केले.
