दि. ११ ऑक्टोबर

इंदापूर बस स्थानकात गैरसोय व स्वच्छतेचा अभाव…… रेशमा शेख प्रदेश सचिव मानव विकास परिषद यांनी दिला उपोषणाचा इशारा
इंदापूर बस स्थानकावर प्रवासासाठी सतत गैरसोय दिसून येते तसेच स्वच्छतेचा कायमचा अभाव दिसून येतो. बस स्थानकावर अनेक प्रवासी रोज येतात जातात त्यांना आवश्यक असणाऱ्या गरजांची पूर्तता येथे होत नाही, महिला स्वच्छतागृहांची तर पुरतीच वाट लागली आहे. शौचालयाच्या दरवाजे व खिडक्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. 8 ऑक्टोबर रोजी, महिला शौचालयामध्ये अनुचित प्रकार घडता घडता वाचला,तोही महिला व मुलीच्या प्रसंगावधानामुळे , या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण होतो . बस स्थानकावर वारंवार, दागिने चोरीच्या घटना घडतात . बस स्थानकावरील प्रवास करणाऱ्या मुली ,महीला, वृद्ध, शाळेतील लहान विद्यार्थी,ही असुरक्षित . या संपूर्ण घटनेची जबाबदारी एसटी प्रशासनाची असेल . बस स्थानकावरील वाढलेली अस्वच्छता, शौचालये, तसेच होणारे इतर सुरक्षेतेचे प्रश्न, यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी, रेश्मा नौशाद शेख,महाराष्ट्र प्रदेश सचिव मानव विकास परिषद यांनी केली आहे.
आमच्या तक्रारीची दखल जर घेतली नाही तर दिनांक १० नोव्हेंबर रोजी असंख्य महिला सह, संबंधित कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल. संबंधित महिला संघटनाने सदरच्या निवेदनाची प्रत व्यवस्थापकासह इंदापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक इंदापूर यांना दिली आहे.
यावेळी माधवी सोननिस, मानव विकास परिषद तालुका अध्यक्ष , तसेच जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष कल्पना भोर, राष्ट्रवादी महिला उपशहराध्यक्ष उज्वला चौगुले, श्रीकांत मखरे कार्याध्यक्ष इंदापूर शहर न्याय विभाग इत्यादी उपस्थित होते.
