दि. २० ऑक्टोबर

इंदापूर : (दि २०) इंदापूर महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी महाविद्यालयामध्ये स्थानिक इतिहास लेखन या विषयावरती डॉक्टर उषा भोईटे – पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

बुधवार (दि१८) रोजी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक विद्या गायकवाड यांनी वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे प्रस्ताविका मध्ये वाचनाचे महत्त्व पटवून देताना फायदे किती हे पण सांगितले.

डॉक्टर उषा भोईटे – पवार यांनी स्थानिक इतिहास विषयाचे महत्त्व पटवून देताना म्हणाल्या की जगाचा देशाचा, राज्याचा इतिहास शिकण्या अगोदर आपल्या गावचा , तालुक्याचा इतिहास शिकणे गरजेचे आहे व नंतर जगाचा, देशाचा , राज्याचा इतिहास अभ्यासावा. त्यांनी पुढे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूरच्या स्थानिक इतिहासाची माहिती दिली. 

यावेळी उपस्थित असणारे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र शिरसट यांनी उषा भोईटे – पवार यांचा परिचय करून देताना त्यांच्याविषयी सांगितले की त्या एक प्राथमिक शिक्षक असून त्या इतिहास विषयांमध्ये सेट नेट व पीएचडी इथपर्यंत कसे शिक्षण घेतले याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष कला शाखाप्रमुख डॉक्टर भिमाजी भोर होते यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बिराजदार, हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर पवार, प्राध्यापक मोरे, प्राध्यापक निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नामदेव पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विशाल चव्हाण यांनी केले. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *