दि. १० नोव्हेंबर

इंदापूर : शनिवारी ओबीसी आरक्षण समर्थनार्थ व आरक्षण रक्षणार्थ तालुक्यातील ओबीसी बांधवांचे बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती क्रांतीज्योती विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी आरक्षण बचाव समितीचे पांडुरंग (तात्या) शिंदे यांनी सांगितले

सविस्तर माहिती अशी मराठा समाजाचा समावेश कुणबी प्रवर्गात व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. शासनाच्या वतीने ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांची नोंद ओबीसी प्रवर्गात होणार असल्याचे जाहीर केल्याने ओबीसी सुद्धा आक्रमक झाला आहे व सरळ सरळ ओबीसी विरुद्ध मराठा वाद उफाळून आला आहे.याच पार्श्वभूमीवर ओबीसी बांधव सुद्धा एकत्र येत असल्याचे दिसत आहे. ओबीसीच्या समर्थनार्थ राज्यभर तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंत बैठकांच्या आयोजन चालू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या शनिवार ११ नोव्हेंबर रोजी श्री संत सावतामाळी मंदिर सावता माळी नगर इंदापूर येथे दुपारी ११ वाजता तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

 

बैठकीमध्ये प्रमुख मागण्या या आहेत

 

जातीनिहाय जनगणना करण्यात यावी

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये 

सरकारी नोकरीतील कंत्राटी तत्त्वावर पदभरती बाबतचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा

सद्यस्थितीतील ५२℅ असलेल्या ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळावे

केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी

सरकारी शाळा महाविद्यालय दवाखाने व इतर संस्थांच्या खाजगीकरणाबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृह व्हावे व स्कॉलरशिप तात्काळ देण्यात यावी

ओबीसी जनगणनेनुसार शेतकरी शेतमजुरांच्या विकासाकरिता बजेटमध्ये अनुदानासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी

ओबीसीचा सरकारी नोकरीतील अनुशेष (बॅकलाॅग) जाहीर करण्यात यावा

सर्वच शासकीय विभागातील लाखो रिक्त पदांची भरती त्वरित करण्यात यावी

क्रिमिलियरची घटना बाह्य अट रद्द करण्यात यावी

ओबीसी कर्मचाऱ्यांना अनुसूचित जाती जमातीच्या धर्तीवर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे

महा ज्योती या स्वायत्त संस्थेस सारखी / बार्टीच्या धर्तीवर निधी उपलब्ध करून देण्यात यावा

खाजगी क्षेत्रातही आरक्षण देण्यात यावे

प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालय व अभ्यासिका तयार करण्यात यावी

इत्यादी प्रमुख मागण्यासह बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पांडुरंग तात्या शिंदे यांनी दिली. एकच मिशन बचाव ओबीसी आरक्षण हा नारा देऊन उठ ओबीसी जागा हो ओबीसी आरक्षणाचा धागा हो म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी इंदापूर तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतीज्योती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी आरक्षण बचाव समितीचे पांडुरंग (तात्या) शिंदे यांनी केले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *