दि.१५ नोव्हेंबर

इंदापूर : वरकुटे गावचे राष्ट्रवादी (अजित पवार गट) पार्टीचे निष्ठावंत व आमदार दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू समर्थक संदेश (काका) देवकर यांची तालुका प्रवक्ते पदी नुकतीच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली.
संदेश देवकर यांचे घराणे एकेकाळी स्वर्गीय शंकराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून तालुक्यात ओळखले जात होते. संदेश देवकर यांचे बंधू एकेकाळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत होते. संदेश देवकर हे भाजपाच्या शक्ती केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते व आता ते वरकुटे बुद्रुक गावच्या सोसायटीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.गावाच्या स्थानिक राजकारणात या घराण्याचा सक्रिय सहभाग व दबदबा होता व आहे. सध्या त्यांच्याच नेतृत्वाखाली व सक्रिय सहभागातून ग्रामपंचायत ताब्यात आहे. स्थानिक राजकारणात व पंचक्रोशीत या घराण्याच्या शब्दाला बऱ्यापैकी मान दिला जातो व त्यांचे सर्व धर्मियांशी सलोख्याचे संबंध आहेत.
संदेश (काका) देवकर हे अल्पावधीतच आपल्या अभ्यासू व स्पष्ट स्वभावामुळे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या अतिशय जवळचे झाले.व तालुक्याचे पक्षाच्या प्रवक्ते पदी त्यांची निवड करून त्यांच्यावर पक्षाची ध्येय धोरणे व पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची महत्त्वाची जबाबदारी आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सोपविले आहे . त्यांच्या निवडीचे स्वागत तालुक्यात व वरकुटे गाव व पंचक्रोशीत व मित्र परिवारामध्ये व राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये होत आहे.
