दिनांक २८ नोव्हेंबर

डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप यांनी ऑन्कोलॉजीसाठी INICET 2023 (AIIMS) सुपरस्पेशालिटी परीक्षेत संपूर्ण देशात AIR -04 मिळवून दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जगताप यांच्या कालठण नं 1येथील निवासस्थानी जाऊन सत्कार केला व व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप हे मूळचे इंदापूर तालुक्यातील कालठण नं 1 चे रहिवासी आहे. त्यांचे वडील पी.डी.सी.सी बँकेत ब्राँच मॅनेजर आहेत व आई गृहिणी. अनिकेतचे शिक्षण सुरुवातीला इंदापूर येथील शाळेत झाले. त्यानंतर, त्याने सायन हॉस्पिटल, मुंबई येथून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. पदविकासाठी एम डी मेडिसिन साठी त्याने सफदरजंग मेडिकल कॉलेज, दिल्ली येथे प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये असताना त्यांनी कॅन्सर स्पेशालिटीमध्ये रस घेतला आणि त्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ डॉ. अनिकेत जगताप यांनी प्रयत्नपूर्वक मेहनत घेऊन या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. पुढील कालावधीतही त्यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रातील मोठे कार्य व्हावे यासाठी डॉ. जगताप यांना शुभेच्छा.
