इंदापूर पोलीस स्टेशन मधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत पदोन्नती

 

इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे लक्ष्मण पोपट साळवे, विनोद भिमदेव रासकर, अक्षय अशोक गोफने या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक पदावरून हवलदार या पदावर पोलीस खात्याअंतर्गत पदोन्नती मिळाली. पदोन्नती झालेने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांचा सन्मान केला.

हे तीनही पोलीस कर्मचारी सन २००७ या वर्षी पोलीस सेवेत दाखल झाले आहेत.

लक्ष्मण पोपट साळवे यांनी आजपर्यंत बारामती शहर व वालचंदनगर या ठिकाणी नोकरी केली आहे. विनोद भीमराव रासकर यांनी यवत व सध्या कार्यरत इंदापूर या ठिकाणी आहेत. अक्षय अशोक गोफने यांनी दौंड यवत व वालचंद नगर इत्यादी ठिकाणी नोकरी केले आहे.

तीनही पोलीस कर्मचारी पोलीस सेवेत असताना थेट जनतेने मिसळून सेवा बजावत असल्याने जनता व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये सलोखा टिकल्याचेच दिसून येत आहे.

या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस नाईक पदावरून हवालदार या पदावर पोलीस खात्यांतर्गत पदोन्नती झाल्याने पोलीस प्रशासन व राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

आज (दि.१८) रोजी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष समद सय्यद यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन साळवे व रासकर यांचा पुष्प गुच्छ देऊन देऊन सन्मान केला.यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे केला इंदापूर शहराध्यक्ष अनिल ढावरे, सामाजिक कार्यकर्ते साजन ढावरे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, ॲड.सलमान पठाण, पोलीस पाटील महेश नलवडे, उपस्थित

होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *