
इंदापूर (दि.२०) : सालाबादप्रमाणे इंदापुरातील सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. शिंगारे , पर्यवेक्षिका सौ काळे पी. जे., माता पालक संघाचे सचिव सौ मोहिते आर. एस. सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माता पालक संघाच्या च्या उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष रेश्मा शेख या होत्या.
गेल्या अनेक वर्षापासून सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. या कार्यक्रमांमध्ये विद्यालयात शिकत असणाऱ्या मुले व मुली यांच्या माता व शहरातील विविध क्षेत्रातील महिला वर्ग उत्साहाने सहभागी होत असतो. राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, व क्रीडा इत्यादी क्षेत्रातील महिला उपस्थित असतात.
रेश्मा शेख आपल्या अध्यक्षीय मनोगत मध्ये म्हणाल्या की आपली मुले विद्यालयात वेळेवर जातात का अभ्यास करतात का ? याकडे महिलांनी बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे मोबाईलचा अतिवापर याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. इंदापूर पोलीस स्टेशनच्या दक्षता समिती वर कार्यरत आहे सर्रासपणे अल्पवयीन मुले व मुली मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांच्या हातून गंभीर चुका होत असतात त्या होऊ नये यासाठी आपण दक्ष असणे गरजेचे आहे. विद्यालयात माता पालक संघाची दर महिन्याला मीटिंग आयोजित करण्यात येते या मीटिंगसाठी सर्व मातांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
यावेळी छायाताई पडसळकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर प्राची देवकर यांनीही मुले व मुलांच्या आहाराविषयी आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये मातांना सूचना केल्या. महिलांनी आरोग्य विषयक स्वतःची व आपल्या पाल्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी आहार कोणता घ्यावा त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी तसेच मासिक पाळी मध्ये कोणती काळजी घ्यावी याविषयी सर्व माता पालकांना मार्गदर्शन केले मुलगा मुलगी भेदभाव न करता दोघांकडे सारखेच लक्ष देऊन त्यांना योग्य संधी उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन केले. पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी आई म्हणून आपली भूमिका कशाप्रकारे निभवावी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या व माता पालक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ मोहिते आर. एस. यांनी तर सूत्रसंचालन सौ भोंग पी.एस. यांनी केले व वर्षा नागणे यांनी आभार मानले.
.
