दिनांक १३ फेब्रुवारी

इंदापूर : तालुक्यातील निमसाखर येथे सलग व्या वर्षी १७ फेब्रुवारीपासून छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, निमसाखर तालुका इंदापूर आयोजीत तीन दिवसीय शिवजन्मोत्सव २०२४ चे विविध सामाजिक उपक्रम राबवून मुख्य राजवाडा, बाजारतळ, निमसाखर येथे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजन्मोत्सव २०२४ या कार्यक्रमाचे उद्घाटक तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजय कुमार परीट, वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, डॉ.सुरेखा पोळ, प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ एम.के.इनामदार आहेत.
शिवजन्मोत्सव २०२४ चे आयोजन मोठ्या दिमाखात होत असताना आयोजकांनी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे.या मध्ये दिनांक

१७ फेब्रुवारी
रोजी मुक्ताई ब्लड बँक यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबीर, अद्वैत मेडीकल फाऊंडेशन नातेपुते यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीर, जादुगार शक्ती कुमार यांचा मनोरंजन कार्यक्रम,
१८ फेब्रुवारी
१ली ते ४ थी व पाचवी ते ८ वी पर्यंत
चित्रकला स्पर्धा, चंदु काका सराफ अँन्ड सन्स प्रा.लि.याचया सौजन्याने महिलांसाठी खास होम मिनिस्टर व सोन्याच्या आकर्षक बक्षिसे,
यासाठी
सौ .अनुराधा रणवरे मो.९४२१८९२६४९,
सौ.सगिता रणवरे मो.९७३०७१३६९७ वर संपर्क साधावा
शिवप्रताप ग्रुप इंदापूर यांच्या सौजन्याने
लाठीकाठी व मर्दानी खेळ,
१९ फेब्रुवारी अखेरच्या दिवशी
बालशिवाजी राजे पाळणा, विद्यार्थी व सर्व शिवभक्त समवेत नाशिक येथील ढोल पथकाच्या निनादात शिवमुर्तीसह शाही मिरवणूक व मुख्य राजवाडा बाजारतळ निमसाखर येथे
स्वर संगम ग्रुप यांच्या सौजन्याने शाहीर मल्हार माने ,निर्माते पांडुरंग वाघ यांचा शिवगिते व पोवाडयाचा भव्य कार्यक्रम होणार आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती निमसाखर यांचे शिवजन्मोत्सवाचे हे सलग १३ वे वर्ष आहे.
१९ फेब्रुवारी रोजी स्व.विलासराव विठ्ठलराव रणवरे यांच्या स्मरणार्थ शिवराज विलासराव रणवरे यांच्या सहयोगातुन स्नेह भोजनाचा कार्यक्रमआयोजित केला आहे.
