दिनांक २३ फेब्रुवारी

 

इंदापूर : निरा भिमा सहकारी साखर कारखाना लि. शहाजी नगर रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे येत्या रविवारी (२५ फेब्रुवारी) रोजी माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक

अध्यक्ष , राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कुस्ती आखाड्यामध्ये निकाली कुस्त्या दरवर्षीप्रमाणे होणार असून यंदाच्या कुस्ती मैदानात भारतातील व महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांची मांदियाळी आहे. कुस्ती शौकिनांसाठी ही एक पर्वणीच आहे. युवकांची ओढ कुस्तीकडे लागावी व क्रीडा क्षेत्राबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा काळाची गरज आहे यासाठी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सर्व संचालक यांनी या निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. यंदाच्या या जंगी भव्य निकाली कुस्ती मैदानात खालील नामांकित पैलवानांच्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

१) पै. सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) विरुद्ध पै.गौरव मच्छीवारा (भारत केसरी जागतिक विजेता)

२) पै. माऊली कोकाटे (उपमहाराष्ट्र केसरी) विरुद्ध पै.पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी)

३) पै. प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पै.महेंद्र गायकवाड (उपमहाराष्ट्र केसरी)

४)पै. दादा मुलांनी विरुद्ध पै. सुहास गोडगे

५) पै. मनीष रायते विरुद्ध पै. विक्रम भोसले

६) पै. कालीचरण सोलंकर विरुद्ध पै. समीर शेख

७) पै. सतपाल सोनटक्के विरुद्ध पै. प्रशांत जगताप

८) पै. रवी चव्हाण विरुद्ध पै. विजय शिंदे

 

यासह अनेक कुस्त्या होणार आहेत.याच दिवशी सकाळी १० पासून कुस्त्यासाठी पैलवानांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *