दिनांक २३ फेब्रुवारी

इंदापूर : निरनिमगाव व सुरवड येथे ग्रामपंचायतींच्या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजनाचे कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते आज शुक्रवारी (दि.23) संपन्न होणार आहेत. निरनिमगाव येथे 4 वा. तर सुरवड येथे 5.30 वा. हे कार्यक्रम होणार आहेत.

नीरनिमगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, आंगणवाडी केंद्र इमारत उद्घाटन आदि कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार हे असणार आहेत. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच व निरा भिमा कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील व ग्रामस्थांनी केले आहे.

तर सुरवड येथे ग्रामपंचायत कार्यालय व व्यापारी गाळे यांचा उद्घाटन समारंभ हर्षवर्धन पाटील यांचे संपन्न होणार आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासबापू वाघमोडे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच योगिता शिंदे व उपसरपंच गीता कोरटकर, ग्रामपंचायत सदस्य व सुरवड ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *