दिनांक २३ फेब्रुवारी

इंदापूर /प्रतिनिधी :

कालठण नं१ ता. इंदापूर जि.पुणे येथे राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह युवक व शिवभक्त उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी राजमुद्रा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती सोहळा ढोल ताशा व गगनभेदी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांच्या निनादात मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम आयोजकाच्या वतीने राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवाजी महाराजांचा पराक्रम व अठरापगड जातीसाठी राबविण्यात आलेल्या धोरणाविषयी व राष्ट्रभक्तीसाठी प्रेरणादायक स्तुती सुमनांचे सादरीकरण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना संचालक हनुमंत जाधव,अण्णासाहेब कोळेकर, सचिन जाधव, ब्रह्मदेव सपकाळ, नंदू जगताप,तानाजी सपकाळ, बाळासाहेब मदने,किंचक जगताप, दत्तात्रय सपकाळ, रमेश मदने राजमुद्रा प्रतिष्ठानचे विजय पाडूळे, जितेंद्र पाडूळे, विक्रम पाडूळे,आशुतोष जावळे जावेद मुलानी, जितेंद्र गिड्डे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दत्तात्रेय चोरगे यांनी केले व अक्षय पाडूळे यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *