प्रकाश आरडे  : स्वराज्य न्यूज

इंदापूर तालुक्यातील काही शहरांमध्ये व खेड्यामध्ये अवैद्य व्यवसाय चालू असल्याचे निदर्शनास आल्याने व सध्या नवरात्र उत्सव चालू असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा देवी भक्तांना अवैध धंदे वाल्यांचा त्रास होऊ नये यासाठी इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असणारी मदत केंद्रासह पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना  सक्त सूचना देऊन अवैध धंदेवाल्याचा बंदोबस्त करण्याची मोहीम राबविली आहे. याचाच एक भाग म्हणून निमगाव केतकी येथे दिनांक  २५ सप्टेंबर रोजी  अवैद्य दारू धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून 19 हजार रुपयाची देशी व विदेशी दारू जप्त केली. सदर कारवाई मध्ये निमगाव केतकी पोलीस मदत केंद्रांतर्गत पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्यासह पोलिस नाईक शिंदे, पोलीस नाईक भोसले ,पोलीस नाईक कांबळे, पोलीस शिपाई कांबळे, पोलीस कर्मचारी बालसिंग, महिला पोलीस नाईक मुजावर यांनी भाग घेतला. सदर छापा मध्ये सापडलेला मुद्देमालासह आरोपी वरती विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सोपोनी दाजी देठे ,पोलीस कर्मचारी शनिदेव कांबळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *