दिनांक १२ मार्च

इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगाव येथील महिपती (तात्या) कदम यांची मुलगी शिवानी हिची नुकतीच ठाणे विभागात कृषी सहाय्यक पदी निवड झाली.

शिवानी हिचे शिक्षण शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय शारदा नगर बारामती येथे झाले आहे. कृषी सहाय्यक पदासाठी पुणे येथे परीक्षा दिली असता परीक्षेचा अंतिम निकाल लागला व शिवानी ठाणे विभागात कृषी सहाय्यक पदी पास झाली.

शिवानी हिचे वडील महिपती (तात्या) कदम हे भाटनिमगाव तालुका इंदापूर येथील रहिवासी असून त्यांना तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. नुकतीच कृषी सहाय्यक पदावर निवड झालेली शिवानी चे चार वर्षांपूर्वी लग्न झाले पण त्यांना शिक्षणाची आवड असल्याने व माहेर व सासरचे सर्वांनी तिला तिच्या आवडीप्रमाणे शिक्षणास पाठिंबा दिल्याने आज शिवानी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याने परिसरात तिचे व आई वडील व सासरच्या सर्वांचे अभिनंदन होत

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *