दिनांक १३ मार्च

इंदापूर : श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथील नंदा गुलाब बनसुडे यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहाच्या वतीने पुणे (सहकारनगर) राजीव गांधी ई लर्निग स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात शंभर उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले. त्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमाच्या शतक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

यावेळी नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूरच्या उपक्रमशील शिक्षिका नंदा गुलाब बनसुडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंदा बनसुडे यांचा नो मोबाईल, नो TV हा उपक्रम कोरोनाच्या काळात, अथवा अँड्रॉइड मोबाईलच्या अती वापराने आणि टीव्ही बघण्याच्या अती सवयीने मुलांच्या मनावर, शिक्षणावर आणि नैतिक मूल्यांवर कसा दुष्परिणाम झाला आहे आणि त्यातून मुलांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार, व बिघडत चाललेला आपापसातील संवाद हे सर्व चित्र नियमित काही सवयितील बदल हे नियमित शिक्षणाबरोबरच कसे बदलता येतात, अश्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश या पुस्तकात आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन, घरातील सूसंवाद, नवीन गोष्टी करण्यातली गंमत, आणि अनुभवाची देवाण घेवाण करणे असे संस्कार देणे आजच्या बदलत्या काळाची गरज बनत आहे. असे मत या उपक्रमातून दिसून येत आहे.या कार्यक्रमास शुभांगी चव्हाण- उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपा या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच SCERTचे अध्यक्ष राहुल रेखावार , सहसंचालक डॉ .शोभा खंदारे, आणि माणिक देवकर, क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. देवराव चव्हाण सर, बळीराम जाधव सर आणि आयुब शेख सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *