दिनांक १८ मे

इंदापूर (पिंपरी) : पिंपरी येथील शेतकरी कुटुंबातील कै. जालिंदर नामदेव पवार यांचे प्रथम वर्षश्राद्ध शुक्रवार (दि.१७) रोजी इंदापूर तालुक्यातील पिंपरी येथे विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक शारदा कुबेर पवार यांचे ते सासरे होत व प्रगतशील बागायतदार व राजकीय सामाजिक क्षेत्रात परिचित असणारे कुबेर पवार यांचे ते वडील होते.
गेल्या वर्षी जालिंदर पवार यांचे निधन झाले. त्यावेळी देखील इंदापूर तालुक्याबरोबर राजकीय, सामाजिक क्षेत्रात दांडगा संपर्क असणारे मुलगा कुबेर पवार यांच्या स्नेहामुळे शेजारील तालुक्यातून देखील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता व आज (दि.१७) देखील प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

कै. जालिंदर पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त छत्रपती संभाजी नगर येथील ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड यांचे फुलांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनाने जमलेला विराट जनसमुदाय भारावला.
शेतकरी पुत्र असलेले कुबेर पवार यांचा तालुक्यात विविध क्षेत्रातील लोकांशी अतिशय घनिष्ठ ऋणानुबंध असल्याने व ते नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याने काल (दि.१७ ) रोजी वडील कै. जालिंदर पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
