प्रकाश आरडे :  स्वराज्य न्युज

दापूर विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये बुधवार दि. २८/०९ / २०२२ रोजी विविध ठिकाणी सार्वजनिक शासकिय विकासकामांचे भूमीपुजन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जाहीर कार्यक्रम पत्रिका काढुन केले जात आहे. सदर विकास कामास शासनाने निधी दिलेला असुन शासनाचे प्रतिनिधी म्हणून कोणास ही न बोलवता फक्त पक्षाचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात येत आहे. हे सरकारी नियमाच्या विरोधात आहे, अशी टीका इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड शरद जामदार यांनी केली आहे.सदर विकास कामांच्या भूमीपुजनाचे कार्यक्रम करण्यासाठी सरकारी यंत्रणा व अधिका-यांचा नियमबाह्य वापर केला जात आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर बहुतांश विकास कामांना स्थगिती दिलेली असताना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर कार्यक्रम पत्रिका काढुन सतत विकास कामाचे भूमीपुजन व उदघाटने करीत आहेत. विकास कामांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही निधी नसताना विकास कामे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केली जात असल्याचे जाहीर केले जात आहे, अशी टीका इंदापूर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केली.शरद जामदार म्हणाले,’ शासन परिपत्र क. संकीर्ण २०२० / प्र.क्र. ४५ / १८ (र. व का.) २१ जुलै २०२१ परिपत्रकान्वये अशा राजकिय पक्षाच्या वतीने घेण्यात येणा-या विकास कामांच्या भूमीपुजन व उद्घाटनांना कोणत्याही सरकारी अधिका-यास उपस्थित राहता येत नाही किंवा सरकारी यंत्रणेचा वापर करता येत नाही. असे असताना देखील इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून सतत उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. आता आपण सत्तेवर नाही, आपले सरकार सत्तेवर नाही हे लोकप्रतिनिधीनी लक्षात ठेवावे. सरकारी नियमांचे उल्लंघन करून असे राज्य शासनाचे विकास कार्यक्रम घेता येत नाहीत याची लोकप्रतिनिधींनी जाण ठेवावी.’ असे अँड.शरद जामदार यांंनी नमुद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *