दिनांक २४ मे

इंदापूर (दि.२४ ) : तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व आरोपींना त्वरित अटक करण्यात असे निवेदन माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले .
निवेदनात असे नमूद केले आहे की तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा इंदापूर शहर व तालुका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत. जर तालुका दंडाधिकार्यावरच असे हल्ले होत असतील तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागावा. हल्ल्यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
निवेदनावर पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे, जिल्हा उपाध्यक्ष समदभाई सय्यद, कार्याध्यक्ष संजय (डोनाल्ड) शिंदे, तालुका उपाध्यक्ष सिकंदरबाई बागवान, तालुका सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विकास खिलारे,इंदापूर शहराध्यक्ष श्रीकांत मखरे, युवक कार्याध्यक्ष अजिंक्य ढाणे, सोशल मीडिया अध्यक्ष नागेश शिंदे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष डॉक्टर रियाज पठाण व ओबीसी शहराध्यक्ष मयूर शिंदे इत्यादींच्या सह्या आहेत.
