दिनांक २४ मे

इंदापुर ( दि.२४ ) : तहसील कचेरीच्या जवळच असणाऱ्या संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील आपल्या सरकारी सुमो गाडीतून कचेरीत जात असताना आज्ञाताने गाडीवर हल्ला केला यातून तहसीलदार व चालक थोडक्यात बचावले या घटनेचा आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र निषेध केला
यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की तहसीलदार श्रीकांत पाटील लक्ष अधिकारी म्हणून तालुक्या मार्गदर्शित असून त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र असे असताना त्यांच्या अशा प्रकारचा हल्ला होणे हे अतिशय धक्कादायक असून या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करीत आहे तसेच ज्यांनी कोणी ला केला आहे त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला
हर्षवर्धन पाटील बोलताना म्हणाले की तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर आज धक्कादायक प्रकारे हल्ला करण्यात आला आहे तसे धक्काबुकी करण्यात आली ही घटना निषेधार्य आहे अशी घटना इंदापूर मध्ये याआधी झाली नाही यामध्ये आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जावी यासाठी पोलीस यंत्रणेला त्यांनी सूचना दिली आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर हल्ला होणे असे प्रकार कधी खपवून घेतले जाणार नाहीत तसेच सरकारी अधिकारी आपल्या परीने काम करत असतात मात्र अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे चुकीचे आहे. असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
