दिनांक ८ जून

करमाळा (दि.८) : बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा आयोजित सालाबादप्रमाणे रविवारी (दि.९) रोजी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे यांनी सांगितले
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थी व पालक तसेच शिक्षक यांना प्रोत्साहन मिळावे या निरपेक्ष भावनेने बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्यावतीने दरवर्षी गुणवंताचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. तसेच अंगणवाडी सेविकांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचाही या सन्मान सोहळ्यात सन्मान करण्यात येतो अशी माहिती बहुजन मराठी पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे यांनी दिली .
या सन्मान सोहळा कार्यक्रमास पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गणेश भाऊ करे पाटील संस्थापक अध्यक्ष यश कल्याणी सेवाभावी संस्था, डॉ. निलेश मोटे , ॲड. बाबुरावजी हिरडे, बाल विकास अधिकारी आनंद जाधव, बालविकास पर्यवेक्षिका आतकर मॅडम, विलास नाईकनवरे संस्थापक योद्धा अकॅडमी जेऊर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे या सन्मान सोहळ्यास रविवारी दि. ९/६/२०२४ रोजी पंचायत समिती करमाळा येथे उपस्थित राहावे असे बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा व आयोजक महिला जिल्हाध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांनी अवाहन केले आहे.
