
२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशीच माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या विरोधात राष्ट्रसेवा दलाचे गफूरभाई सय्यद यांचे एकदिवसीय लाक्षणीक ऊपोषण आहे. माहिती मागणाऱ्या अर्जदाराला मागितलेल्या माहितीचे पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे मागितलेली माहिती संकलित करून वेळेत त्या अर्जदाराला देणे बंधनकारक असल्यामुळे जनमाहिती अधिकाऱ्याची दमछाक होते व कालांतराने तो अर्जदार आपण मागितलेल्या माहितीचा अर्ज माघार घेत असताना गैरसमजुतितून व अनावधानाने असे शब्द प्रयोग करून तो माहिती अधिकार मागे घेतो, अशा व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे राष्ट्रसेवा दलाचे गफूरभाई सय्यद यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की माहिती अधिकाराचा वापर करून मिळवलेल्या माहितीचे पुढे काय होते? तसेच मिळवलेल्या माहितीचा आधार घेऊन संबंधित अधिकारी अथवा विभागवार तक्रारी अर्ज दाखल करणारा व्यक्ती संबंधित तक्रार परत घेत असताना गैरसमजुतितुन व अनावधानाने असे शब्दप्रयोग करून ती तक्रार मागे घेतो, त्यावेळेस संबंधाीताची भूमिका संशयास्पद वाटते. म्हणून अशा एकूणच प्रकरणाची नव्याने तपासणी होऊन संबंधितावर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत .व वारंवार वेगवेगळे विभागात माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या व्यक्ती अथवा व्यक्तींची सखोल चौकशी व्हावी, तसेच माहिती मागणारे व्यक्तीला मागितलेल्या माहितीच्या संदर्भात ज्ञान आहे का? व मागविलेल्या माहितीशी अशा व्यक्ती अथवा व्यक्तींचा दुरान्वये काही संबंध आहे का ? याची चौकशी होऊनच माहिती का पुरवली जाऊ नये. या व अशा अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधून संबंधितावर योग्य ती कारवाई व्हावी या एकमेव उद्देशाने लाक्षणिक उपोषण करणार असून यासंदर्भातील मागण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा व स्वरूप निवेदनाद्वारे पुढील काळात कळविले जाईल असेही निवेदनात स्पष्ट केले आह
वास्तविक पाहता माहिती अधिकारात माहिती मागणारा व्यक्ती मोघम स्वरूपाची माहिती मागत असेल तर जन माहिती अधिकारी ची खरोखरच दमछाक होते हे खरे आहे. ती माहिती अतिशय विस्तृत स्वरूपात असल्यामुळे साहजिकच संबंधित यंत्रणेवर ताण येतो. माहिती अधिकारात मागितलेली माहिती ठोस असेल तर जन माहिती अधिकाऱ्याची कोंडी होत नाही व ती माहिती वेळेवर संबंधित अर्जदाराला देता येते हेही तितकेच खरे आहे.
गफूरभाई सय्यद यांनी स्वराज्य न्युज शी बोलताना असेही स्पष्ट केले आहे की माझे उद्याचे लाक्षणिक उपोषण हे प्रामाणिक माहिती मागणाऱ्या व्यक्ती अथवा माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्या विरोधात किंवा संबंधित प्रामाणिक जनमाहिती अधिकाऱ्यांच्या विरोधात नसून जे या माहितीचा दुरुपयोग करतात त्यांच्या विरोधात आहे. कृपया प्रामाणिक काम करणाऱ्यांनी माझे आंदोलन योग्य असेल तर पाठिंबा द्यावा अशी ही विनंती केली आहे.
राष्ट्रसेवा दलाचे गफूर भाई सय्यद यांनी उद्याचे लाक्षणिक उपोषण करीत असलेल्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री गृहमंत्री विरोधी पक्ष नेते जिल्हाधिकारी इंदापूर तहसीलदार पोलीस निरीक्षक इंदापूर यांना दिलेले आहेत.
