इंदापूर (दि.११) : तालुक्यातील हिंगणगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग अतर्गत पशुधनाच्या संवर्धनाकरिता राबविण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन पंधरवडा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ शहा (महादेव नगर) यांच्या वतीने गटविकास अधिकारी सचिन खुडे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सचिन केमलापुरे व डॉ. रामचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले .

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत पशुधनाच्या संवर्धनाकरिता शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पशुसंवर्धन पंधरवाडा आज (दि.११ ऑगस्ट) हिंगणगाव येथे पशुपालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पशुवैद्यकीय तपासणी अधिकारी पी .एम. तरंगे म्हणाले पाळीव जनावरांच्या आरोग्य विषयी काही तक्रार असल्यास आपण आमच्याशी संपर्क करावा . आपल्या पाळीव जनावरांचे आरोग्याची काळजी आपण काळजीपूर्वक करावी यावेळी त्यांनी अनेक जनावरांच्या तपासण्या करून जागेवरच जंतनाशक गोळ्या दिल्या.

पुढे बोलताना पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पी.एम. तरंगे म्हणाले हे शिबिर गटविकास अधिकारी सचिन खुडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर सचिन केमलापुरे व डॉक्टर रामचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.

यावेळी पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पशुपालकांनी पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.एम.तरंगे यांचे आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *